घाबरले असाल तर ताबडतोब भाजपामध्ये जा, म्हणजे सर्व गुन्हे माफ होतील
राज्याचे अन्न आमि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आज ओबीसी हक्क परिषदेत भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.घाबरले असाल तर ताबडतोब भाजपामध्ये जा, म्हणजे सर्व गुन्हे माफ होतील असा टोला अन्न आमि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यांनी लगावला आहे. ओबीसी आरक्षण का काढलं ? हे आधी सांगा आणि त्याची भरपाई कशी करणार याची माहिती द्या, शरद पवार साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं, देशात सर्वत्र आरक्षण होतं, पण १०२ वी घटना दुरुस्ती करताना केंद्र सरकारने ते काढलं. मग परत त्यांनी राज्यांना अधिकार दिले, पण आधी तुम्ही आरक्षण काढलं का हे सांगा, असा सवाल त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
इथे सगळे जण अनेक मुद्दयांवर जोरजोरात बोलले, चर्चा केली, पण सर्वांनी सावध राहा उद्या इन्कम टॅक्स घरी नाही आला म्हणजे झालं. घाबरले असाल त्यांनी भाजपामध्ये जा. म्हणजे सर्व गुन्हे माफ होतील. असा टोला त्यांनी लगावला आहे. जो जो या कामात येईल, त्यांच्या मागे इन्कम टॅक्स, ईडी लावली जाते, जसे एकनाथ खडसे साहेबांच्या मागे लागले. असं भुजबळ यावेळी म्हणाले.
यावेळी छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्षरित्या ओबीसी मंत्र्यावर निशाणा साधला आहे. आत्ता हे गुलाबराव पाटील मंत्रिमंडळात देखील ते माझ्या पाठीशी ओबीसी मुद्द्यांवर बोलत बोलतात, त्याबद्दल त्यांचे आभार मानले. ओबीसी मंत्री देखील खूप आहेत, मी कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही, पण यावर बोलणारे थोडे फार थोडे मंत्री आहेते असाही टोका भुजबळांनी लगावला आहे.
यावेळी भुजबळांनी तुरुंगातील दिवसांच्या आठवणी ताज्या केल्या. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, कपिल पाटील यांनी तुरुंगात असताना माझा जीव वाचवला. माझी तब्येत बरी नसताना त्यांनी खूप मदत केली. ते विधानमंडळात उभे राहिले, आवाज उठवला. या माणसाचा शब्द मी मोडू शकत नाही. शरद पवारांनी देखील मला साथ दिली. त्यांनीही पत्र पाठवले होते. त्यामुळे मला उपचार मिळाले. असंही भुजबळ म्हणाले.