गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 10 एप्रिल 2022 (10:15 IST)

आज झुकलात तर पुन्हा भगव्याचे दर्शन होणार नाही- फडणवीस

devendra fadnavis
"कोल्हापुरात येताच बाळासाहेब ठाकरे यांचे एक पोस्टर पाहायला मिळायचं आणि एक ऊर्जा मिळत असे. मात्र, आज आलो त्यावेळी पोस्टर पाहायला मिळालं, पण बाळासाहेब यांच्या फोटोसोबत सोनिया गांधी यांचा फोटो होता. ते पाहून वेदना झाल्या. कोल्हापूर उत्तर हे भगव्याचे असून, ते भगव्याकडे आलेच पाहिजे, असे म्हणत आज झुकलात तर, पुन्हा भगव्याचे दर्शन होणार नाही", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आयोजित प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, "विरोधी पक्षाने तुमची काय अवस्था केलीय हे विधिमंडळात पाहताय ना? असा प्रश्न उपस्थित करत 2019 साली महापुरात आम्ही जी मदत दिली तशी मदत तुम्ही महापुरात का दिली नाही असे ते म्हणाले.
या देशात लोकशाही आहे तुमची दहशत चालणार नाही. महाराष्ट्रात सरकार नाही तर भ्रष्टाचार आहे. कोरोना काळात इंग्लिश दारुवरचा टॅक्स कमी केला बेवड्यांचे हे सरकार आहे का? असा प्रश्न देखील फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला"