गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 22 जुलै 2021 (20:41 IST)

पूरपरिस्थती निर्माण झालेल्या जिल्ह्यांमध्ये मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. तसेच रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील अनेक नद्या धोका पातळीच्या वर वाहत असल्याने सदर ठिकाणी एन. डी. आर. एफ. कोस्ट गार्ड, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूरपरिस्थिती मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
 
तसेच पुणे विभागातील संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेवून सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुध्दा एन.डी.आर.एफ च्या तुकड्या तैनात करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर मार्फत मदत व बचावकार्य करण्यात येत आहे अशी माहिती ही आपत्ती विभागाकडून प्रसिध्दीस देण्यात आली आहे.