गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2019 (10:29 IST)

उत्तम बातमी येत्या चार दिवसात मान्सून महाराष्ट्रात होणार दाखल, कोकणात पडल्या जोरदार सरी

देशात आणि राज्यात चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अतिशय लांबलेला मान्सून अखेर राज्यात दाखल झाला आहे. राज्यातील रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मान्सूनने हजेरी लावली असून, जिल्ह्यांमध्ये जोरदार सरी कोसळलल्या आहेत. हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजानुसार येत्या ४ दिवसांमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर मान्सून सक्रिय होणार आहे. दरवर्षी प्रमाणे जून च्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ७-८ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात येतो मात्र मधील काळात वायू चक्रीवादळामुळे मान्सून पुढे सरकण्यासाठीचे पोषक असणारे वातावरण तयार झाले नाही. यामुळे वातावरणातील आर्द्रता निघूल गेल्याने मान्सूनचा प्रवास खंडित झाला होता. मात्र पुन्हा मान्सूनसाठीचे पोषक वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण किनाऱ्यावर आणि दक्षिण मध्य महाराष्टातील काही भागात मान्सूनमुळे पाऊस झाला आहे. तर राज्यातील पूर्व अर्थात विदर्भाच्या काही भागात मात्र मान्सूनचा जोर कमी राहणार आहे. तर विदर्भाच्या गडचिरोली, उपराजधानी नागपूर येथे काही भागात देखील पावसाने हजेरी लावली आहे. सोबतच हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्राचा उर्वरित भाग म्हणजे मराठवाडा, कोकण इत्यादी ठिकाणी देखील मान्सूनचा मुसळधार पाऊस २२-२३ जून पर्यंत हजेरी लावणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मागील २० वर्षात प्रथमच मान्सून एवढ्या उशिरा दाखल झाला आहे. असे असूदेखील पावसाळ्याच्या शिल्लक राहिलेल्या दिवसांत मान्सून पावसाची दरवर्षीची सरासरी पासून भरून काढेल अशी चिन्हे आहेत. गोवा वेधशाळेने मान्सूनची अधिकृत घोषणा केली आहे. मच्छिमारांना दक्षतेचा इशारा देत समुद्र खवळलेला असल्याने समुद्रात न जाण्याच्या सूचना वेधशाळेने दिल्या आहेत.