Incident in Beed:वारंवारच्या छेडछालीला कंटाळून अल्पवयीन मुलीने केला आत्महत्येच्या प्रयत्न
बीडमध्ये एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने सततच्या छेडछालीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी इयत्ता आठवीत शिकते. तिच्या शाळेतील एका मुलगा सतत तिची छेड काढत असे. मुलीने आपल्या कुटुंबियांना ही गोष्ट सांगितली, त्यांनी मुलाला समज दिल्यानंतर देखील हे प्रकार सुरूच होते. त्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले. मुलीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे तिच्यावर योग्य उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.मुलीची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिचा जबाब नोंदवू जाऊ शकला नाही. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे.