बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 ऑगस्ट 2022 (16:06 IST)

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी पोलिस कर्मचाऱ्यावर केला जीवघेणा हल्ला; पोलीस गंभीर जखमी

nasik jail
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात दहा ते बारा कैद्यांनी पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पोलिस कर्मचारी प्रभूचरण पाटील हे गंभीर जखमी झाले आहे.त्यांच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिक मध्यवर्ती कारागृहात महिन्याभरापूर्वीच पुणे येथील येरवडा जेलमधून या कैद्यांना आणले होते. याच कैद्यांनी कारागृहात प्रभूचरण पाटील यांच्यावर हा हल्ला केला. यात १० ते १२ कैदी होते. हा हल्ला का केला गेला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस प्रशासन या घटनेची गंभीर चौकशी करत आहे.