मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 जून 2023 (21:25 IST)

कोल्हापूर जिल्हात दंगलीच्या पार्श्वभुमीवर 31 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद

कोल्हापूर शहरात उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने 31 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधीचे परिपत्रक राज्याच्या गृहमंत्रालयातील सचिवालयाने काढले आहे.
 
कालपासून कोल्हापूरात ताणावाचे वातावरण असताना आज कोल्हापूर बंदची हाक दिल्यानंतरही दुसऱ्या दिवशी शहरात दंगल उडाली. काही ठिकाणी दगडफेक आणि दुकांनांची तोडफोड करण्य़ात आली. पोलीसांची अतिरिक्त कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी राहूल रेखावार यांनी जिल्हा शांत ठेवण्याचे आवाहन केले आहे. तर जिल्हा पोलीस प्रमुख राजेंद्र पंडित यांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांततेचे आवाहन केले आहे.
 
सोशल मीडीयाद्वारे चुकीची माहीती किंवा अफवा पसरू नयेत आणि त्यातून अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज रात्री आणि उद्या दिवसभर इंटरनेट सेवा बंद ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे अहवाल पाठवला होता. आज दुपारी राज्याच्या गृहमंत्रालयाच्या सचिवालयातून एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले असून त्यात येत्या 31 तासासाठी इंटरनेट सुविधा बंद असणार असल्याचे म्हटले आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor