गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 जुलै 2021 (08:15 IST)

नशेच्या धुंदीत त्याने कंटेनर घुसवला कापड बाजारात

अहमदनगर येथे पुण्याकडे जाण्यासाठी निघालेला एक कंटेनर हा मुख्य मार्गांनी न जाता तो नगर शहराच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजारांमध्ये थेट आल्यामुळे एकच खळबळ उडाली.दरम्यान संबंधित गाडी चालक हा नशेमध्ये असल्याचे बोलले जात आहे.
 
नगर शहरामध्ये अवजड वाहनांना बंदी असताना सर्रासपणे वाहने शहरांमध्ये येत आहे.त्यातच नगर शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू आहे त्यामुळे बरीच वाहतूक ही बाह्यवळण रस्त्याच्या मार्गे वळविण्यात आलेली आहे.
 
यातचमध्य रात्रीच्या सुमाराला मनमाडच्या दिशेने पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनर हा बाह्यवळण मार्गाने न जाता तो थेट नगर शहरातील कापड बाजारांमध्ये येऊन धडकला. विशेष म्हणजे त्याच्या मागे सुद्धा एक दोन अशा गाड्या होत्या, मात्र त्या मागच्या मागे निघून गेले.यातच चालकाचा ताबा सुटल्यामुळे तो रस्त्याच्या एका बाजूला अडकून पडला घास गल्ली कॉर्नरला हा कंटेनर अडकून पडल्यामुळे मोठी तारांबळ झाली.कोतवाली पोलीस व अन्य पोलिस या ठिकाणी आले व त्यांनी हा कंटेनर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.