बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 डिसेंबर 2019 (10:32 IST)

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ IPS अधिकाऱ्याचा राजीनामा

काल राज्यसभेने मंजुरी दिलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ राज्य पोलीस दलातील IPS अधिकारी अब्दुर रहमान यांनी राजीनामा दिला आहे.
 
हे विधेयक भारताच्या धार्मिक एकतेच्या विरोधात आहे. मी न्यायप्रेमी लोकांना विनंती करतो की सर्वांनी लोकशाही पद्धतीने या विधेयकाला विरोध करावा. हे सर्व घटनेच्या मुलभूत तत्त्वांविरोधात सुरू आहे, असे नमूद करत अब्दुर रहमान यांनी राजीनामा दिला आहे. ते 1997च्या तुकडीचे अधिकारी आहेत. नुकतीच त्यांची मानवी हक्क आयोगाच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली होती.