शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सांगली/जळगाव , शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018 (13:01 IST)

जळगावमध्ये माजी विधायक सुरेश दादा जैन आणि शिवसेनेला झटका

सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला शुक्रवारी ( 3 ऑगस्ट) सकाळी दहा वाजता सुरुवात झाली आहे.
 
जळगाव महानगरपालिकेवर भाजपाचे कमळ फुलणार की शिवसेनेचा भगवा फडकणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मनपाच्या 75 जागांसाठी 303 उमेदवार रिंगणात असून या सर्व उमेदवारांचा भाग्याचा आज फैसला होणार आहे.
 
सांगली महापालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांसाठी बुधवारी 62.15 टक्के मतदान झाले. 451 उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या प्रमुख चार पक्षांसह स्थानिक आघाड्या व अपक्षांनी गेले महिनाभर प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. 

जळगाव निवडणूक निकाल
राजकीय पक्ष विजय आघाडी
भाजपा - 59
शिवसेना - 14
राष्ट्रवादी काँग्रेस - -
काँग्रेस - -
समाजवादी पार्टी - -
एमआयएम  - 3
अपक्ष - 1
सांगली निवडणूक निकाल
राजकीय पक्ष विजय आघाडी
काँग्रेस 7 2
राष्ट्रवादी काँग्रेस 8 1
भाजपा 12 4
शिवसेना - -
स्वाभिमानी आघाडी 1 -

- सांगली : माजी महापौर काँग्रेसचे नेते किशोर जामदार पराभूत