शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (10:20 IST)

सोलापुरात मजुरांना बेदम मारहाण

सोलापुरातील माढा तालुक्यात  भुताष्टे गावातील दोन मजुरांनी पैशाची मागणी केल्यावर त्यांना  आरोपीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
सोलापुरातील माढा तालुक्यात दोन मजुरांना कामाचे पैसे घेऊन जाण्यासाठी निरोप पाठवला हे मजूर पैसे मिळणार या आनंदात होते मात्र तिथे गेल्यावर त्यांना दोरी ने हात पाय बांधून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. 
 
या व्हिडिओमध्ये आरोपीने त्यांचा पाठीवर आणि हातावर दोरीने मारहाण केल्याचे दिसत आहे. विकास नाईकवाडे आणि कसबे असे या मजुरांची नांवे आहेत. त्यांना कामाचे पैसे घेण्यासाठी या असा निरोप पाठविला नंतर ते आल्यावर त्यांना वाईट वागणूक दिली त्यांना शिवीगाळ करत बेदम मारले. 

याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपींवर कारवाई करण्यात आली. या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.