मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (09:34 IST)

जमीन घोटाळा प्रकरण: मंदाकिनी खडसे यांना दिलासा

मुंबई – पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. या सुनावणीत न्या. भारती डोंगरे यांनी त्यांना 16 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे.
 
मंदाकिनी खडसे या ईडीला चौकशीत सहकार्य करत आहेत. त्यांनी वेळोवेळी चौकशीसाठी हजेरी लावली आहे. याची नोंद घेत त्यांना दिलेला अंतरिम दिलासा न्यायालयाने कायम ठेवला आहे.
 
दरम्यान, भोसरी जमीनप्रकरणी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात ईडी चौकशी सुरू आहे. याप्रकरणी ईडीने खडसे कुटुंबीयांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही समावेश आहे. याप्रकरणी गिरीश चौधरी सध्या अटकेत आहेत.