बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (21:06 IST)

पिंपरी-चिंचवडमध्ये मोठे सेक्स रॅकेट उघड, 16 नायजेरियन तरुणी पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात चालणारे मोठे सेक्स रॅकेट पोलिसांनी उघड केले आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या या कारवाईत तब्बल 16 नायजेरियन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपळे गुरव परिसरातल्या एका इमारतीत या तरुणी व्यवसाय करत होत्या. त्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
 
गेल्यावर्षी जानेवारीमध्ये स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये रॅकेट सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पिंपरी - पिंपरी - चिंचवड परिसरात स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली गतवर्षी सेक्स रॅकेट चालविण्यात येत होते. आता पुन्हा सेक्स रॅकेट उघड झाल्याने कोणाच्या आर्शीवादाने हे रॅकेट सुरु होते, याचीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे.