सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 जून 2023 (20:47 IST)

जाणून घेऊ पत्नी पीडित पुरुष आश्रम या बद्दल सर्व माहिती

आज वटपोर्णिमा. आजच्या दिवशी साता जन्माच्या गोष्टी केल्या जातात. सकाळी वडाच्या झाडाची पुजा केली जाते आणि असे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले जातात.
 
पण थांबा आज तुम्हाला फक्त वडाचेच पुजन करणाऱ्या महिलांचे फोटो दिसणार नाहीत तर पुरूषांचे पण दिसतील आणि ते पण पिंपळ पुजताना. अस का? तर हे पुरूष आहेत जॉनी डेप कॅटेगरीतले. म्हणजेच पत्नीपिडीत पुरूष… मग काय जाणून घेऊ पत्नी पीडित पुरुष आश्रम या बद्दल सर्व माहिती
 
वास्तविक वटपोर्णिमेच्या आदल्या दिवशी पत्नीपिडीत पुरूष पिपंळाच्या झाडाला उलट्या फेऱ्या मारून पत्नीच्या त्रासातून मुक्त कर अशी प्रार्थना करतात अन् हे काम करणारे पुरूष असतात..
पत्नी पीडित पुरुष आश्रम, औरंगाबाद-शिर्डी रस्त्यावर हा बोर्ड आणि इमारत  चर्चेचा विषय आहे. कारण इथे पत्नी पीडितांनी एकत्र येऊन आश्रम सुरु केला आहे. कायदे महिलांच्या बाजूने आहेत, समाजाची सहानुभूती महिलांना मिळते. त्यामुळे काहीवेळा पुरुषाची चूक नसतानाही नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे भरत फुलारेंनी हा आश्रम स्थापन केला आहे. जागतिक पुरुष हक्क दिनाचं (19 नोव्हेंबर) औचित्य साधून या आश्रमाचं उद्धाटन करण्यात आलं. सध्या या आश्रमात सहा जण राहतात. स्वत:ची कामं स्वत: करतात. काही जणांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप आहे. काही जणांविरोधात शारीरिक आणि मानसिक छळाची तक्रार आहे. त्यांना कायदेशीर मदत करणं, मानसिक आधार देणं, त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी पत्नी पीडित संघटना झटत आहे . पत्नी पीडितांच्या या आश्रमाला खोट्या केसेसमुळे अडचणीत आलेल्यांनी फंडिंग केलं आहे. त्याशिवाय वर्कशॉपच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न यावर आश्रमाचा कारभार चालतो. घटस्फोटांच्या केसेसमध्ये गेल्या काही वर्षात वाढ होताना दिसत आहे. त्यामागची कारणं अनेक आहेत, पण विभक्त होतानाही काही वेळा मानसिक छळाचे प्रकार घडतात. काही वेळा न्यायालयीन लढाईत पुरुष आणि स्त्री दोघांचंही मानसिक आणि आर्थिक खच्चीकरणही होतं. जे भरुन निघणं अवघड आहे.
 
याबाबत खुद्द ॲड भारत फुलारेच सांगतात. ते म्हणतात,
 
 माझ्या लग्नानंतर मला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. त्यातून मी आत्महत्या करण्यापर्यन्त गेलो. आयुष्याचा बराच काळ या लढाईतच गेला. याच काळात माझ्यासारखेच अनेक पुरूष मला भेटले. त्यातूनच अशा आश्रमच उभा करण्याची संकल्पना डोक्यात आली.
 
 यासाठी मी पुन्हा वकिलीचं शिक्षण घेतलं. आश्रमाकडून दर रविवारी पुरूषांसाठी वर्कशॉप घेण्यास सुरवात केली.
 
त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च ते काहितरी काम करुन भागवतात व घरगुती हिंसाचाराच्या केसेस लढवत राहतात. अगदी ३२ वर्षांपासून ते ७८ वयापर्यन्तचे पुरूष इथे आहेत.  हे पुरूष आपआपसातले दुख, वेदना, झालेला त्रास एकमेकांसमोर मांडतात आणि आत्महत्या करण्याच्या विचारापासून दूर जात लढण्याचं बळ मिळवतात.  
 
इतक्यावरच न थांबता पिंपळ पोर्णिमा, गाढवापुढे निवेदन वाचणं असे जगावेगळे उपक्रम राबवत पुरूषांवर देखील घरगुती हिंसाचार होतात या महत्वाच्या प्रश्नाकडे लोकांच लक्ष वेधून घेतात.
 
इथे सांगण्यासारखा मुद्दा इतकाच येतो की, प्रत्येक पुरूषावर झालेली घरगुती हिंसाचाराची केस ही जाणीवपुर्वक केलेली असते अस नाही. कित्येक महिलांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो. पण आपल्या आजूबाजूला असेही पुरूष आहेत ज्यांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो.

Edited By-Ratnadeep Ranshoor