1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 4 मार्च 2022 (14:48 IST)

दोन महिने प्रशासक बसू द्या आणि हा विषय मिटवा : पंकजा मुंडे

राज्य सरकारनं आता ओव्हरड्यूची व्याख्या ठरवावी. तुम्ही सांगा प्रशासक बसवलाय, मग आणखी दोन महिने प्रशासक बसू द्या आणि हा विषय मिटवा, असं आवाहनही भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी केलंय. पंकजा मुंडेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी त्या बोलत होत्या.
 
या देशात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या ओव्हरड्यू झालेल्या आहेत. फक्त ओबीसी आरक्षणाच्याच निवडणुका ओव्हरड्यू झालेल्या नाहीत. प्रशासक बसलेत, प्रशासक दोन महिने अजून बसतील. मग ओबीसीचं आरक्षण पूर्ण करून जो काही डेटा कोर्टात द्यायचा आहे, तो तात्काळ देऊन ओबीसीच्या आरक्षणासहीत निवडणुका घ्याव्यात. मी प्रत्येक वेळी सांगतेय आणि सावध करतेय, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.