सोमवार, 26 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 2 जुलै 2022 (15:20 IST)

'ते' पत्र बेकायदशीर, यावर आम्ही कायदेशीर उत्तर देऊ : केसरकर

शिवबंधन हे खरं नाते, अफिडेव्हिट हे खरं बंधन नाही. शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी काही वक्तव्य केले तर आम्ही उत्तर देणार नाही. शिवसेने एकनाथ शिंदे यांना नेते पदावरुन हटविल्याचे पाठवलेलं पत्र बेकायदशीर आहे. यावर आम्ही कायदेशीर उत्तर देऊ. त्यांनी ऐकलं नाही तर पुढील भूमिका घेऊ, असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिला आहे.
 
सभागृहाच्या नेत्याचा अपमान होतो तेव्हा हक्कभंग येतो. इतकं हे पद महत्वाचे आहे. त्यांच्या पक्षांला हे शोभणार नाही. ही कृत्य लोकशाहीला शोभादायक नाही. आमच्याकडे राजकारणाची चर्चा होत नाही. कायदेशीर लढाई असेल तर त्याला कायदेशीर उत्तर देवू. पहिल्यादा अध्यक्ष निवड त्यानंतर विश्वासदर्शक ठराव येईल. त्यानंतर मंत्रिमंडळाची चर्चा होईल. आता कोणतीच चर्चा त्या संदर्भात झालेली नाही. आमचं कुटुंब एकत्र आहे. पण आमचे कुटुंब प्रमुख बाहेर आहे. ते आमच्यात आले तर आम्हाला आनंद होईल, असे दीपक केसरकर म्हणाले.
 
शिदे यांनी आपण शिवसेनेचेच आहोत, असे वारंवार सांगितले. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ही बाब रुचलेली नाही. शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. शिवसैनिकांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची काल शिवसेना नेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. शिवसेनेने याबाबतचं पत्र काढलं आहे. या कारवाईमुळे आता शिंदे विरुद्ध ठाकरे असा वाद चिघळण्याची शक्यता होती. आज शिंदे गटाकडून उत्तर देताना इशारा देण्यात आला आहे. याबाबत दीपक केसरकर यांनी गोव्यात पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे.