शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (13:41 IST)

नाशिकच्या रुग्णालयातच रंगली दारू पार्टी

नाशिकाच्या रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकच्या झाकीर हुसैन या रुग्णालयाला आधी सिनेमाच्या शूटिंग साठी देण्यात आले नंतर रुग्णालयात काहींनी दारू पार्टी केल्याचं समजलं आहे. शुंटिंग बघण्यास रुग्णालयातील कर्मचारी व्यस्त असल्यानं रुग्णालयाचे हाल देखील झाले. 

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात  एका चित्रपटाच्या शूटिंग  करण्याची परवानगी देण्यात आली. या दरम्यान काहींनी या रुग्णालयात चक्क मद्यप्राशन केले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. वर्षभरापूर्वी याच रुग्णालयात ऑक्सिजनच्या गॅसगळतीमुळे 22 पेक्षा अधिक रुग्ण दगावले होते. आता या रुग्णालयात दारू पार्टी रंगल्यामुळे खळबळ माजली आहे.