रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 मे 2020 (14:29 IST)

येथे मद्यविक्री 17 मे पर्यंत बंदच

जळगाव- लॉक डाऊन तीन सुरू झाल्यानंतर काही भागांमध्ये मद्यविक्री सुरू होणार असल्याच्या बातमीने अनेकांना आनंद झाला होता. मात्र जळगाव जिल्ह्यात 17 मे पर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहे. 
 
जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी आज आदेश काढून याविषयी स्पष्ट केले आहे. 
 
याआधी तीन मेपर्यंत मद्य विक्री बंद राहणार असल्याचे आदेश होते मात्र आता मध्यम विक्रीचे दुकाने सुरू करणार असल्याच्या वृत्ताने अनेकांना आनंद झाला होता. मात्र जळगाव जिल्ह्यातील मद्य शौकिनांच्या आनंदावर मात्र विरजण पडले आहे.