Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मसजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. वाल्मिक कराड यांच्या शरणागतीनंतर आता धनंजय मुंडेही संकटात सापडले आहे. वाल्मिक कराड यांच्या जवळीकतेमुळे विरोधकांकडून आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असून धनंजय मुंडे आता अडचणीत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही यावर मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....