गुरूवार, 12 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 5 डिसेंबर 2024 (21:58 IST)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करू

devendra fadanavis
Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. तसेच प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुंबईतीलआझाद मैदानावर संध्याकाळी 5.30 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेनेचे कार्यवाह एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....

08:59 AM, 5th Dec
भंडारा येथे अतिक्रमणावर चालवण्यात आला बुलडोझर
नगरपरिषदेने बुधवारी भंडारा शहरातील अतिक्रमणे हटविण्याच्या प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी रस्ते व नाल्यांवरील बेकायदा बांधकामे हटविण्याची मोहीम सुरू केली. तसेच सकाळी दहा वाजता नगरपरिषद, शहर पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त पथकाने सार्वजनिक रस्ते व नाल्यांवरील बेकायदा बांधकामे हटविण्याची कारवाई सुरू केली. परिषदेच्या आवाहनावरून अनेकांनी स्वेच्छेने आपली अतिक्रमणे काढली. सविस्तर वाचा

08:58 AM, 5th Dec
मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था, 4 हजार जवान तैनात
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आज गुरुवार, 5 डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. फडणवीस संध्याकाळी आझाद मैदानावर शपथ घेणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठीही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या काळात चार हजारांहून अधिक पोलिसांना तैनात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सविस्तर वाचा 
 

08:58 AM, 5th Dec
आज देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस हे तिसऱ्यांदा मुंबईतीलआझाद मैदानावर संध्याकाळी 5.30 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेनेचे कार्यवाह एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. सविस्तर वाचा