शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 डिसेंबर 2021 (11:01 IST)

तापमानात घट होऊन महाराष्ट्र गारठणार

सध्या उत्तर भारतातील राज्यात  थंडीचा जोर वाढला आहे. राज्यात ढगाळी वातावरण निवळल्यावर वाऱ्याचे प्रवाह सुरु झाल्यामुळे राज्यात थंडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे . त्यामुळे येत्या दोन -चार दिवसात तापमानात घट होऊन कड्याक्याची थंडी पडून महाराष्ट्र गारठणार आहे. अशी शक्यता हवामान व्यक्त व्यक्त केली आहे .
मुंबईत ठाण्यात आणि नवी मुंबईत तापमानात घट  झाल्यामुळे गारवा जाणवत आहे. 
राज्यात पुढच्या चार दिवसात रात्रीच्या तापमानात सरासरीपेक्षा घट होण्याची शक्यता हवामान वेधशाळेने व्यक्त केली आहे. सध्या थंडीसाठी अनुकूल असे वातावरण निर्माण झाले आहे.