मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (21:48 IST)

अपघातात नववधूसह अनेकांचा दुर्देवी मृत्यू

तीन दिवसांपूर्वी ज्या वधूच्या हातावर मेहंदी लागून ती वैवाहिक बंधनात बांधली गेली होती त्या नववधूचा माहेरहुन सासरी परतणीच्या कार्यक्रम करून सासरी जात असताना अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. भोकर-किनवट मार्गावर सोमठाणा पाटीजवळ आज सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झाला. या अपघातात टाटा मॅजिक आणि ट्रकची धडक होऊन झाला. या अपघातात नववधू सह 8 जणांचा मृत्यू झाला आहे. पूजा पामलवाड रा.साखरा असे या मयत झालेल्या नववधूचे नाव आहे. तर नवरदेव जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर दोन्ही वाहन रस्त्याखाली गेले होते. हे वाहन जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. 
 
पूजा पामलवाड हिचा विवाह नागेश कन्नेवाड याच्या सोबत 19 फेब्रुवारी रोजी झाला. पूजाला मांडव परतणीसाठी जारीकोट येथून साखरा येथे भोकर मार्गे मॅजिक ने जात असताना सायंकाळी सहाच्या सुमारास समोरून येणाऱ्या ट्रक ची धडक बसून अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळी रक्ताचा सडा पसरला होता. काहींचे हात-पाय वेगळेहून पडले होते. या अपघातात नवरदेव नागेश साहेबराव कन्नेवाड, सुनीता अविनाश टोकलवार, गौरी माधव चोपलवाड, अविनाश टोकलवार, अभिनंदन मधुकर कसबे हे जखमी झाले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.