शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 जानेवारी 2023 (08:35 IST)

नागपुरात पैश्याच्या पाऊसासाठी अल्पवयीन मेहुणीवर ८ महिने बलात्कार

rape
नागपुरात अंधश्रद्धेच भयानक प्रकरण समोर आले आहे. पैश्याच्या पाऊस पडावा यासाठी दाजीने अल्पवयीन मेहुणीचे तब्बल ८ महिने लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात आणखी धक्कादायक म्हणजे पिडीतेच्या बहिणीचाच हात असल्याची बाबा उघडकीस आली आहे. या घटनेने आजच्या युगातही अंधश्रद्धेच भूत काहींच्या मानगुटीवर बसलेले असल्याचे स्पष्ट होते. ही घटना नरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. याने परिसरात एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात बलात्कार आणि विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दाजी आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत संशियत दाजी वास्तव्यास आहे. त्याचा प्रेम विवाह झाला होता. दरम्यान, दाजी आणि बहिणीसोबत नववीत शिकणारी पीडिता राहायला आली. त्यामुळे त्यांना संसाराचा खर्च उचलणे कठीण जात होते. त्यामुळे दोघेही पैसे कमविण्याचे साधन शोधत होते.
 
दरम्यान, आरोपीची एका भोंदू बाबासोबत ओळख झाली. त्याने त्याला पैशांचा पाऊस पाडण्याचे आश्वासन दिले. त्यात बाबाने त्याला पैशांचे पाऊस पाडण्यासाठी अल्पवयीन मेहुणीशी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. सुरुवातीला आरोपीच्या पत्नीने नकार दिला. मात्र नंतर पतीने तिला कसेबसे पटवले म्हणून, पत्नीनेही यास होकार देत आपल्या लहान बहिणीला पतीसोबत संबंध बनविण्यासाठी प्रवृत्त केले. 
 
लहान बहिणीसोबत सतत आठ महिन्यांपर्यंत आरोपीने मेहुणीचे लैंगिक शोषण केले. मात्र याविरोधात पिडीतेने आता हिंमत करून विरोध केला असता आरोपीने अल्पवयीन मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीमुळे मुलीची प्रकृती खालावली. याची माहिती नातेवाइकांना मिळताच त्यांनी मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
 
नातेवाईकांनी लगेचच नरखेडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दाम्पत्याला गजाआड केले आहे. न्यायालयाने दोघांना पोलीस नंतर पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor