ठाणे मनपावर धडकणार शेतकरी आणि राज ठाकरे, महामोर्चाचे कारण काय ?
मनसेच्या वतीने आज ठाणे मनपा वर मनसे प्रमुख राज ठाकरे स्वतः शेतकऱ्यांच्या महामोर्चात सहभागी होणार आहे. तुम्ही शेतकरी वर्गाने हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. फक्त ठाणे नव्हेच राज्यातील सर्व शहरांमध्ये शेतकर्यांसाठी केवळ जागाच नव्हे, तर इतरही सुविधा मिळवून देण्यासाठी मनसे प्रशासनाला भाग पाडणार आहे अशी भूमिका मनसे ने घेतली आहे. मी बाकी प्रश्नांवर राज्यस्तरावर जे काही करायचे, ते करीनच. तूर्तास याविरुद्ध आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे, असे राज यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे. आज होणाऱ्या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याने ठाणे शहरात चक्काजाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ठामपाने भाजपाच्या तक्रारीवरून आंब्याचा स्टॉल हटवण्याच्या मुद्द्यावरून राज यांनी पत्रात म्हणतात की, शेतकर्यांची सध्याची अवस्था जर सरकारचा एक घटक असणार्या लोकप्रतिनिधींना समजत नसेल, तर त्यांना ताळ्यावर आणणे आता गरजेचे झाले आहे. फक्त एक शेतकरी आहे म्हणून ही घटना दुर्लक्ष करणे योग्य नाही, तर ही एक प्रातिनिधिक घटना आहे, असे समजून त्यांना उत्तर देणे गरजेचे आहे, म्हणूनच शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा निघत आहे.
मोर्च्याचे कारण काय ?
ठाण्यातील नौपाडा येथे शेतकरी ते ग्राहक या कार्यक्रमातंर्गत मनसेतर्फे एका शेतकऱ्याने रस्त्यावर आंब्याचा स्टॉल लावला होता. मात्र हा स्टॉल अनधिकृत असून यामुळे नागरिकांना चालण्यास त्रास होतो. त्यामुळे हा आंब्याचा स्टॉल लवकरात लवकर हटवा अशी मागणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी केली. मात्र या स्टॉलच्या शेजारी असलेल्या अनधिकृत गाळा आधी हटवा, नंतर आम्ही आंब्याचा स्टॉल हटवतो अशी भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. मनसे आणि भाजपमध्ये शेतकरी आंब्याचा स्टॉल लावण्यावरून जोरदार राडा झाला होता. त्यामुळे वातवरण तापले होते. हाच मुद्दा मनसेने प्रातिनिधिक करत या शेतकरी प्रश्न करत मोर्चा काढला आहे.