शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (13:26 IST)

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन: विधानभवनाच्या पायर्‍यांवर विरोधकांची निदर्शने

vidhan bhavan
Maharashtra Monsoon Assembly Session :राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना17 ऑगस्ट पासून सुरु झाले आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी  विधानभवनाच्या पायऱ्यांवर निर्दशने केली. 
 
ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा, पन्नास खोके, माजलेत बोके, पन्नास खोके, एकदम ओके, ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी, स्थगिती सरकार हाय हाय, गद्दारांचे सरकार हाय हाय!!!... आले रे आले गद्दार आले, अशा घोषणा दिल्या.

विरोधी पक्षाचे नेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी विधानमंडळाच्या पायऱ्यांवर ईडी आणि शिंदे सरकारच्या विरोधात निर्देशन केले.