शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (14:43 IST)

मुख्यमंत्र्यांच्या मिठाईतूलेत गोंधळ, 21 सेकंदात 100 किलोहून अधिक मिठाई गायब

viral
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते. हा दौरा चांगलाच चर्चेचा विषय ठरला कारण या दरम्यान मुख्यमंत्री शिंदे आणि भुमरेंच्या तुलेचे लाडू आणि पेढे लोकांनी पळवले. 
 
काल औरंगाबाद दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी ठिकठिकाणच्या लोकांच्या भेटी घेतल्या. संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात सभा घेतल्यानंतर मुख्यमंत्री परत जात असताना काही शिवसैनिकांनी हा रस्ता गोमूत्र शिंपडून धुतल्याची माहिती मिळत आहे. दानवे यांनी याबद्दल ट्वीट करत म्हटले की मुख्यमंत्री महोदयांचा ताफा पैठणकडे गेल्यावर पैठण तालुकाप्रमुख मनोज पेरे आणि अन्य शिवसैनिकांनी रस्ता गोमूत्र टाकून धुतला.
 
तसेच या दरम्यान या सभेत मुख्यमंत्र्यांनी केलेलं भाषण देखील चर्चेत राहिली. याच पैठणमधल्या सभेत मुख्यमंत्री शिंदे आणि संदीपान भुमरे यांची पेढे आणि लाडूंनी तुला होणार होती. पण शिंदेंनी या तुलेला नकार दिल्यानंतर त्यांची पाठ फिरताच जमलेल्या गर्दीने या लाडू आणि पेढ्यांवर ताव मारला. कमाल म्हणजे 100 किलो लाडू, 100 किलो पेढे अवघ्या 21 सेकंदात गायब केले.