बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 एप्रिल 2022 (10:40 IST)

MPSC Result: राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चा निकाल जाहीर, प्रमोद चौगुले राज्यात पहिला

MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चा निकाल जाहीर झाला असून त्यात राज्यातून प्रमोद चौगुले हा पहिला आला आहे. तर मुलींमधून रुपाली माने हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून डिसेंबर 2019 मध्ये 200 पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. कोरोनामुळे ही परीक्षा चार वेळा पुढे ढकलण्यात आली होती.
 
2015 पासून त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. यशा अपयशांच्या अनेक फेऱ्यानंतर अखेर यावर्षी त्यांना यश मिळालं आहे. गेल्या परीक्षेत त्यांचा क्रमांक एक मार्काने हुकला होता. आता ते थेट राज्यातून पहिले आले आहेत.
 
हा प्रवास नक्कीच सोपा नव्हतं असं ते सांगतात. कोरोना काळात सांगलीत पूर आला होता. तेव्हाच त्यांच्या घरचे सगळे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. प्रमोद एकटे अभ्यास करत होतो. अशा बिकट परिस्थितीत मार्ग काढून त्यांनी हे यश मिळवलं आहे.
 
या प्रवासात अनेकदा त्यांना सगळं सोडून द्यावंसं वाटलं. मात्र त्यांनी हिंमत सोडली नाही. घरच्यांनी त्यांनी खूप पाठिंबा दिला. स्वत:पेक्षा घरच्यांच त्यांना जास्त पाठिंबा होता.
 
घरच्यांनीही माझ्या निराशेच्या सुरात सूर मिसळले असते तर आज हा दिवस पहायल मिळाला नसता असं ते सांगतात.
 
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चा निकाल जाहीर झाला आहे. त्यात प्रमोद चौगुले राज्यात पहिला आला आहे. तर मुलींमधून रुपाली माने हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून डिसेंबर 2019 मध्ये 200 पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. कोरोनामुळे ही परीक्षा चार वेळा पुढे ढकलण्यात आली होती.
मार्च 2021 मध्ये पूर्व परीक्षा झाली. त्यात 2 लाख 62 हजार उमेदवारांनी नोंदणी केली. तर 1 लाख 71 हजार लोकांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.
 
पूर्व परीक्षेचा निकास सप्टेंबर 2021 मध्ये जाहीर झाला. 3 हजारापेक्षा मुख्य परीक्षेसाठी निवड झाली. 18 ते 29 एप्रिल दरम्यान मुलाखती झाल्या होत्या. प्रमोद चौगुले मुळचे सांगलीचे. त्यांचं शिक्षण नवोदय विद्यालयातून झालं आहे. त्यानंतर त्यांनी सांगलीच्या वालचंद कॉलेजमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर ते भारत पेट्रोलियममध्ये कामाला होते.
 
मार्च 2021 मध्ये पूर्व परीक्षा झाली. त्यात 2 लाख 62 हजार उमेदवारांनी नोंदणी केली. तर 1 लाख 71 हजार लोकांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.
 
पूर्व परीक्षेचा निकास सप्टेंबर 2021 मध्ये जाहीर झाला. 3 हजारापेक्षा मुख्य परीक्षेसाठी निवड झाली. 18 ते 29 एप्रिल दरम्यान मुलाखती झाल्या होत्या. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चा निकाल आज जाहीर झाला आहे. त्यात प्रमोद चौगुले राज्यात पहिला आला आहे. तर मुलींमधून रुपाली माने हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.