सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (19:19 IST)

Nasik Gas Cylinder Blast : नाशिकात सिलिंडरच्या स्फोटात दोन सख्य्या भावांचा मृत्यू

Nashik Gas Cylinder Blast : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात मुसळगाव एमआयडीसी भागात उज्ज्वलनगर येथे घरगुती वापरणाऱ्या गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात दोघा सख्ख्या भावांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कृष्णचंद्रा देवराज साकेत (27) व दीपराज देवराज साकेत (19) मूळचे राहणारे उत्तरप्रदेश अशी या मयत भावांची नावे आहेत. तर शुभम महादेव सोनवणे हा गंभीररित्या भाजला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नरच्या मुसळगाव जवळ एमआयडीसी भागात इतर राज्यातून कामगार वर्ग वास्तव्यास आहे. या ठिकाणी उत्तरप्रदेशातून अनेक कामगार वास्तव्यास आहेत. हे साकेत बंधू कारखान्यात कामाला आहे. सकाळी सात वाजेच्या सुमारास त्या बंधूंपैकी एकाने चहा बनविण्यासाठी गॅस पेटवला. मात्र, तत्पूर्वीच गॅस गळती झालेली असल्याने गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. त्यात हे तिघेही गंभीर भाजले.घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच जखमींना उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कृष्णचंद्रा हा जवळपास 70-75 तर दिपराज हा 60 ते 65 टक्के भाजल्याने दोघांची उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहे.