सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (13:39 IST)

वाहतुकीचे नवे नियम : सीटबेल्ट न लावल्यास ,हेल्मेट न घातल्यास आता दंड होणार

वाहनचालकांसाठी मोठी बातमी आहे. आता वाहनचालकांना वाहतुकीचे नव्या नियमाचं काटेकोर पालन करावे लागणार अन्यथा दंड होऊ शकतो .दुचाकी वाहनचालकांनी हेलमेट न घातल्यास आणि चारचाकी वाहन चालकांनी सीटबेल्ट न लावल्यास नियमांचं उल्लंघन केल्यास मोटार वाहन अधिनियम कायद्यांअंतर्गत रुपये 1000 पर्यंतचे दंड आकारले जाण्याची शक्यता आहे. तसेच विना परमिट वाहन चालवणाऱ्यांवर, वेगाने वाहन चालवणे, सीटबेल्ट नसणे, हेल्मेट नसणे रिफलेक्टर नसणे, टेललॅम्प नसल्यास रुपये 2000 चे दंड आकारण्यात येतील . हे नवे  नियम पुढील आठवड्यापासून लागू होण्याचे सांगितले जात आहे. 

मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाण्याचे सांगण्यात येत आहे. नवीन मोटार वाहन कायद्यानुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना पहिल्या गुन्ह्यासाठी 6 महिन्याचा तुरुंगवास किंवा 1000 रुपयांचा दंड होणार. तर दुसऱ्यांदा कायद्या मोडल्यावर 2 वर्षे तुरुंगावास आणि 15 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार. वाहनावरील नंबर प्लेट रंगीत डिझाईनची असल्यास वाहनचालकांना 1 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा आहे.  राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी  एका वृत्तपत्राला ही माहिती दिली. त्यांनी वाहतुकीच्या  काही नियमांच्या दंडात कपात करण्याचा निर्णय घेण्याची माहिती दिली. वाढत्या अपघातांवर आळा घालण्यासाठी हे नियम लावण्यात येत आहे. एका वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, कायद्या मोडणाऱ्यांवर आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन बन करणाऱ्या वाहनचालकांवर मोठा दंड लावल्याने अपघाताच्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मिशन झिरो फॅटॅलिटी करण्याचे विभागाचे लक्ष आहे. या मुळे दुचाकी वाहन चालकांना शिस्त लागेल वाहन वेग मर्यादावर आळा बसण्याची शक्यता आहे.