रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जानेवारी 2022 (08:59 IST)

सरकारच्या हातालाच नव्हे तर मेंदूलाच लकवा मारला, चंद्रकांत पाटलांची टीका

सांगली येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. “या सरकारची बुद्धी चालत नाही. तसेच कोणतेही निर्णय या सरकारकडून घेतले जात नाहीत. या सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. त्यामुळे या सरकारच्या हातालाच नव्हे तर मेंदूलाच लकवा मारला आहे. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.
 
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलाय काय? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता.
 
आता मात्र संपूर्ण महाविकास आघाडी सरकारलाच लकवा भरल्याची स्थिती आहे. आताचे सरकार कोणतेच निर्णय घेत नाही. एसटी आंदोलनापासून मराठा आरक्षण, धनगर आरक्षणासारखे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. परंतु, हे सरकार त्यावर कोणताही निर्णय घेत नाही. या सरकारच्या हाताला नाही तर मेंदूलाच लकवा मारला आहे.”