बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (15:18 IST)

आता सिंधुदुर्ग ते मुंबई फक्त १ तास २५ मिनिटांत

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ९ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग विमानतळावर पहिले प्रवासी वाहतूक करणारे विमान उतरणार आहे आणि या विमानाची बुकिंग गुरुवारी २३ सप्टेंबरपासून एअर इंडियाच्या वेबसाईटला सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग एअरपोर्टचे स्टेशन व्यवस्थापक समिर कुलकर्णी यांनी दिली.दरम्यान,हवाई मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विट केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विमानतळ आता सुरू होणार आहे.या विमानतळाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे सिंधुदुर्ग एअरपोर्ट या नावाने हे विमानतळ सुरू होणार असून ९ ऑक्टोबर रोजी पहिले विमान प्रवासी घेऊन या विमानतळावर उतरणार आहे. यासंदर्भात विमानतळाचे स्टेशन व्यवस्थापक समिर कुलकर्णी यांनी सांगितले की, ९ ऑक्टोबर पासून सुरु होणारे हे विमान दररोज असणार आहे.
 
हे विमान दररोज दुपारी ११. ३५ वाजता मुंबईहून सुटून ते १ वाजेपर्यंत सिंधुदुर्गात येणार आहे आणि सिंधुदुर्गहून मुंबईला जाण्यासाठी १ तास २५ वाजता सुटून २.५० वाजेपर्यंत मुंबईत जाणार आहे. हे विमान ७० असून केंद्राच्या उडान योजनेत अंतर्भूत आहे.असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी स्टेशन व्यवस्थापक समिर कुलकर्णी यांनी सांगितले की सिंधुदुर्ग ते मुंबई रस्त्याने प्रवास केल्यास सुमारे ९ तास ते २० मिनिटे लागतात. पण हाच प्रवास हवाईमार्गे विमानाने केल्यास प्रवाशांसाठी फक्त १ तास २५ मिनिटांचा हा प्रवास असणार आहे त्यामुळे प्रवाशांचा इतर वेळ वाचणार आहे. सिंधुदुर्गातून मुंबईला जाणारे विमान हे मुंबई येथे २ वाजून ५० मिनिटांनी पोचणार आहे . आणि त्यानंतर ज्या मुंबई विमानतळावरून विमानसेवा असतात त्या दिल्ली बेंगलोर, कोलकत्ता, हैदराबाद आणि चेन्नई सारख्या महानगरात जाणाऱ्या विमानसेवा असतात त्यामुळे या महानगरांमध्ये जायचे असेल तर या विमान सेवेचा फायदा होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.
 
सिंधुदुर्ग एअरपोर्ट वर उतरल्यानंतर उत्तर गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे विमानतळ चांगला पर्याय आहे . चिपी वरून तेरेखोल,अरंबोल आणि मांद्रेम समुद्रकिनारा-यांसाठी ड्रायव्हिंग अंतर अंदाजे ६० किमी आहे गोव्याच्या दाबोळी विमानतळाच्या समान आहे त्यामुळे सिंधुदुर्गचे पर्यटन पाहून प्रवासी गोव्याला जाऊ शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ ऑक्टोबरला पहिले प्रवासी विमान उतरणार आहे .आणि या विमान नाचे ऑनलाईन बुकिंग गुरुवारी २३ सप्टेंबर पासून एअर इंडियाच्या http://www.airIndia.in या वेबसाईटला सुरू झाले आहे यासाठी प्रवाशांनी रऊह हा बुकिंग कोड नोंद करावा अशी माहिती त्यांनी दिली.