बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 जुलै 2018 (15:14 IST)

फुकटच्या तेलासाठी नागरिकांची गर्दी, तेलाच्या टँकरला अपघात

फुकट मग ते कसेही कोठेही मिळो भारतीय लोक गर्दी करून घेण्यासाठी गर्दी करत हजर राहतात. असाच प्रकार अमरावती येथे घडला आहे. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तेलाच्या टँकरला झालेल्या अपघातात सांडलेलं तेल घरी नेण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पंचवटी चौकात नागपूरकडे जाणाऱ्या कच्च्या सोयाबीन तेलाच्या टँकरला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात टँकरला भगदाड पडून त्यातून तेलाची गळती सुरु झाली. त्यावेळी नागरिकांनी सांडत असलेले तेल मिळेल त्या वस्तुंचा वापर करुन भरून नेले आहेत. या आगोदर सुद्धा राज्यात अश्या अपघातात लोकानी मासे, दारू, धान्य, फळभाज्या आणि आंबे लुटून नेले आहेत. अपघातात कोणी जखमी आहे की नाही हे न पाहता फुकटचे कसे मिळेल हे लोक बघतात.