रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 ऑगस्ट 2023 (18:47 IST)

मुलांच्या भांडणातून पालकांच्या हाणामारीत एक मृत

death
Ichalkaranji News मिळालेल्या माहितीनुसार, सद्दाम सत्तार शेख (वय, २७) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत आणि मुख्य आरोपी सलमा आलासे यांच्या दोघांचे मुले इचलकरंजीच्या कोले मळा येथील एका शाळेत इयत्ता पहिलीत शिकतात. दरम्यान, दुपारच्या सुट्टीत खेळता खेळता सलमा यांच्या मुलाचे शेख यांच्या मुलाशी किरकोळ कारणावरून भांडण झाले. यानंतर मृताने सलमा यांच्या मुलाच्या कानशिलात लगावली, याची माहिती सलमाला मिळाली. यानंतर सलामाने तिचा भाऊ शब्बीर अब्दल गवंडी याला बोलावून घेतले.
 
सलमाचा भाऊ शब्बीर आणि मृतक शेख यांच्यात आधीपासूनच वाद होता. शब्बीर शाळेत येताच सलमा आणि शब्बीर शेखला जाब विचारला. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर लाथाबुक्या आणि मारहाणीत झाले. मारहाणीत शेखच्या छातीला जोराचा मार लागल्याने तो जमीनीवर खाली कोसळला. त्याला त्वरीत आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.