गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 डिसेंबर 2021 (08:58 IST)

काँग्रेस विचारांचा माणूसच खरा देशभक्त - विजय वडेट्टीवार

"काँग्रेस विचारांचा माणूसच खरा देशभक्त आहे. आज जे दिल्लीच्या तख्तावर बसलेत ते स्वातंत्र्य संग्राम सुरू असताना इंग्रजांचे पाय चाटत होते," अशी टीका काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर केलीय.
चंद्रपुरातल्या गोंडपिंपरीत वडेट्टीवार निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
भाषणात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, "माझ्यापुढे बसलेल्या देशभक्त, राष्ट्रभक्त मतदारांनो.. मुद्दाम तुमचा उल्लेख मी देशभक्त केला. तुम्ही ज्या विचाराने इथे बसलात तोच विचार देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होता. तुमचा विचार देशासाठी रक्त सांडत होता."
राहुल गांधींच्या 'हिंदू आणि हिंदुत्ववादी' या मुद्द्याचंही वडेट्टीवारांनी समर्थन केलं.
वडेट्टीवार म्हणाले, "आम्ही हिंदू आहोत, हिंदुत्ववादी नाहीत. हिंदुत्ववादी धर्माधर्मात आग लावतात. हिंदू बांधव सर्व धर्माला सोबत घेऊन चालतात."