सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पंकजा मुंडे यांनी केले विनोद तावडेचे कौतुक

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा शिक्षणमंत्री विनोद तावडेचं कौतुक केलं आहे. विनोद तावडे हे तारेवरची कसरत करत आहेत. त्यांच्या कामाची पद्धत पाहून मला दिवंगत नेते प्रमोद महाजनांची आठवण येते. शिक्षणमंत्री असल्याने ते शिक्षकांना पगार देतात, तर मी त्यांच्या बदल्यांचं काम करते, असे पंकजा मुंडेंनी म्हटले. 
 
मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या शाळा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री विनोद तावडेंसह पंकजा मुंडे यांनाही बोलविण्यात आले होते. त्यावेळी, बोलताना पंकजा यांनी विनोद तावडेंचं कौतुक केलं. पण, आपलाही अधिकार सांगायला त्या विसरल्या नाहीत. विनोदजींनी 10 वीच्या मुलांचा व दफ्तराच्या ओझ्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. यापूर्वी आपल्या शाळांना कुचेष्टेने आंतरराष्ट्रीय म्हणून बोलले जात होते. आता तो चांगल्या अर्थाने वापरला जाईल, असा आशावादही मुंडे यांनी व्यक्त केला.