शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 मे 2023 (21:10 IST)

पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडे सारखं निर्भीड वागावं : संजय राऊत

sanjay raut
बीड : गोपीनाथ मुंडे म्हणजे राजकारणातलं दिलखुलास व्यक्तिमत्व होतं. शिवसेना-भाजपची युती राहावी आणि अखंड टिकावी, हे त्यांचं कायम स्वप्न होतं. अनेकदा चर्चेच्या आणि बैठकीच्या माध्यमातून जाहीरपणे त्यांनी भूमिका मांडली. त्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडे सारखं निर्भीड वागावं ही अपेक्षा, असा सल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे.
 
संजय राऊत हे बीड दौऱ्यावर होते.  गोपीनाथ गडावर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची फार गाढ श्रद्धा होती. ठाकरे परिवारासोबत त्यांचे फार जवळचे संबंध होते. शिवसेना-भाजप हे दोन रक्ताचे भाऊ आहेत, अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्यानंतर सर्व नाती तुटली. त्यामुळे ते असते तर कदाचित ती नाती तुटली नसती.
 
वारसा असला तरी त्यांच्या नेतृत्वाची बरोबरी कुणीही करू शकत नाही. मुंडेंचा वारसा म्हणून पंकजा मुंडेंनी निर्भयपणे पुढे यायला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी हे एकच व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांची बरोबरी कुणीही करू शकत नाही. गोपीनाथ मुंडे ज्या पद्धतीने निडरपणे राजकारणात वावरले आणि झुंजले. त्यांनी अनेक कार्यकर्ते निर्माण केले. मुंडे यांच्यासारख्या नेत्यांनी प्रयत्न केल्यामुळे भाजप तुम्हाला थोडाफार कुठेतरी दिसतोय, असं संजय राऊत म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor