पंकजा यांचा बीड मधील माफिया कारभारावरून निशाणा
भाजपा नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील राजकारण, गुन्हेगारी व एकूण सद्य परिस्थितीवरून एक ट्वीट केलं आहे. “बीड जिल्ह्य़ात एका कार्यकारी अभियंताने स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी केली, किती दुर्दैवी! बीलासाठी राजकीय ठेकेदार यांचा दबाव, सर्व प्रकारचे माफिया कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहे, यांची वैधानिक दखल घ्यावी.” असं पंकजा मुंडे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
शिवाय, या मुद्य्याची वैधानिक दखल घ्यावी अशी विनंती करत त्यांनी हे ट्वीट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील टॅग केलं आहे.