मंदिर बांधल्याने दुष्काळ आणि इतर प्रश्न मिटणार का शिवसेना
राम मंदिर प्रश्नी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अचानक कठोर भूमिका घेतली. मात्र या भूमिकेला विरोध देखील होतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेथे जन्मले ते शिवनेरी येथील माती आयोध्येत नेली त्यामुळे ठाकरे यांच्यावर मराठी सेलिब्रिटीजनि टीका केली आहे. "राज्यातील दुष्काळ आणि इतर प्रश्न मिटणार आहेत का ? असा जळजळीत प्रश्न विचारला आहे. यावर प्रसिद्ध अभिनेता हेमंत ढोमे लिहितो की छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आयोध्येला जाणार... का? काय संबंध? म्हणजे काय करायचय नेमकं? अहो मातीत चाललेले त्यांचे गडकिल्ले बांधायचं बघा आधी! हातचं सोडुन पळत्याच्या मागे लागायची जुनी खोड! #येडेबागडे #फाल्तुची_इव्हेंटबाजी"
सोबतच त्याला एका फॉलोअर्स ने प्रश्न विचारला तेव्हा हेमंतने पुन्हा उपरोधक उत्तर दिले आहे. आहे तर, "प्रभु रामचंद्राचे भक्त होते छत्रपती शिवाजी महाराज! म्हणुन त्यांच्या ढासळलेल्या किल्ल्याची माती मंदिर बांधायला न्यायचीय! तसा खुप व्यापक आणि गहन विचार आहे! आपल्या सगळ्यांना काळाच्या पुढे घेऊन जाणार हे सग्गळं! खुप पुढे!"
त्यामुळे आयोध्या खरच शिवसेनेला येत्या निवडणुकीत पावणार का असा प्रश्न विचारला जातो आहे.