शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 डिसेंबर 2021 (22:50 IST)

ओबीसी आरक्षण न मिळण्यामागे राजकिय षडयंत्र?

ओबीसी आरक्षण न मिळण्यामागे १०० टक्के राजकीय षडयंत्र असून याचा छडा लावणार असल्याचे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
नुकतीच सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत स्थगितीचा निर्णय दिला. या पार्श्वभूमीवर भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय अतिशय क्लेशदायक असून ओबीसी आरक्षण पाडण्याचा डाव असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, आमची कोर्टाला तसेच भारत सरकारला विनंती असून इमपीरिकल डेटा गोळा करण्यासाठी वेळ हवा आहे, त्यातच निवडणुका जवळ आल्याने हे राजकीय षडयंत्र असावे असा संशय त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती देण्यामागे राजकीय षडयंत्र असून फडणवीस म्हणतात मी सपोर्ट करतोय, मात्र त्यांचेच लोक कोर्टात जाऊन याबाबत उलटसुलट करत आहेत, त्यामुळे या संदर्भात फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असून कोर्टबाजी करणाऱ्यांना का थांबवत नाही, असा सवाल त्यांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच या प्रकरणात धुळ्याचे वाघ, गवळी या व्यक्ती आहेत. हे लोक कोर्टात जाऊन प्रश्न लावून धरत आरक्षणाला आडकाठी करत आहेत. त्यामुळे येत्या १३ तारखेला वकिलांशी चर्चा करून पुढील नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.