गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (09:21 IST)

मेट्रो नियो प्रकल्पाचे दुबई येथील जागतिक एक्स्पो दरम्यान सादरीकरण

नागपूर -महामेट्रोतर्फे राबवल्या जाणाऱ्या मेट्रो नियो प्रकल्पाचे दुबई येथील जागतिक एक्स्पो दरम्यान सादरीकरण करण्यात आलं. एक अनोखा प्रकल्प म्हणून संपूर्ण देशात चर्चा होत असलेला मेट्रो नियोप्रकल्पाची अंमलबाजवणी नाशिक येथे होऊ घातली आहे. मेट्रो नियो सोबत मल्टी मॉडल इंटिग्रेशन (एमएमआय) या नागपुरात राबवल्या जात असलेल्या प्रकल्पाचे सादरीकरण दुबई एक्स्पोत करण्यात आलं.महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर ब्रिजेश दीक्षित यांनी हे सादरीकरण केलं. महत्वाचे म्हणजे दिल्ली येथे नुकतेच आयोजित झालेल्या अर्बन मोबिलिटी इंडिया (युएएमआय) 2021 च्या संमेलनात मल्टी मॉडल इंटिग्रेशन विषयावर नागपूर मेट्रोला पुरस्कार मिळाला आहे.
 
मेट्रो प्रकल्पाची संकल्पना भारतात नवीन असली तरीही दळणवळणाचे महत्वाचे साधन म्हणून आता हे देशात झपाट्यानं नावारूपाला आली. या प्रकल्पाच्या संचालनादरम्यान नागरिकांना मेट्रोशी जोडणे अजूनही मोठे आव्हान आहे.परिवहनाच्या इतर साधनांचे आणि मेट्रोचे फिडर सेवेच्या रूपात एकात्मीकरण करून या दोन घटकांना जवळ आणता येते आणि हे काम महा मेट्रो नागपूरने केल्याचं डॉक्टर दीक्षित यांनी सांगितलं. वर्ल्ड एक्स्पो दुबई येथे `स्मार्ट आणि किफायतशीर वाहतूक व्यवस्था: नागरी भागातील परिवहनाच्या साधनांवर भर' या विषयावर आयोजित चर्चासत्रा दरम्यान डॉक्टर दीक्षित बोलत होते.यावेळी डॉक्टर दीक्षित यांनी मेट्रो नियो संबंधी सादरीकरण केलं. देशातील टियर-2 आणि टियर-3 शहरांकरता मेट्रो नियो अनोखे आणि स्वस्त सार्वजनिक वाहतुकीचे साधन असल्याचं त्यांनी सांगितलं .मेट्रो नियो पर्यावरण पूरक आणि सुरक्षित वाहतुकीचे साधन आहे.