बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

जगात पाण्याचा, प्रदूषणाचा प्रश्न गंभीर, शांतीच्या मार्गानेच त्यावर उत्तर - राष्ट्रपती

सध्या आपल्या देशात आणि पूर्ण जगात पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणत भेडसावत आहे. त्यामुळे अनेक देश चिंतेत आहेत, मात्र आता वेळ आली असून निसर्गासोबत संम्यक दृष्टीकोण ठेवायचा असून, शांतीच्या मार्गानेच पाणी, प्रदूषण प्रश्नावर उत्तर मिळणार असून त्यातून नक्कीच समस्या सुटेल असा विश्वास देशाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी व्यक्त केले.
 
राष्ट्रपती म्हणाले की मी नुकताच कझाकस्तान येथे दौऱ्यावर होतो, तेथे गेल्यावर कळले की पाण्याची किती गंभीर समस्या आहे. त्यांच्या देशाचे राष्टपती हे या प्रश्नामुळे फार चिंतेत होत, यावरून आपल्या सर्वाना पाहिले पाहिजे की खरच किती गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे आपल्या संत पुरुषांनी निसर्गासोबत योग्य भाव ठेवावा आणि हवे तितकेच घ्यावे असे शिकवले आहे, त्यामुळे आपणही संम्यक दृष्टीने वागले पाहिजे, शांतीचा, अहिंसेचा मार्गच आपल्याला यातून बाहेर काढेल असे राष्टपती यांनी स्पष्ट केले.
 
बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथे विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आहेत. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन उपस्थित आहेत. संमेलन आयोजक स्वामी रविंद्रकीर्तीजी, महामंत्री संजय पापडीवाल आदींनी राष्टपतींचे हेलिपॅडवर स्वागत केले.