गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 एप्रिल 2022 (09:42 IST)

झेंडा लावण्यावरुन दोन गटात राडा; एक जखमी

mumbai police
अमरावतीच्या अचलपूर येथे दुल्हा गेटवर दोन गटांमध्ये झेंडा लावण्यावरून वाद झाला. या वादाचे रूपांतरण दगडफेकीत झाल्याने तुफान राडा पाहायला मिळाला. या भागात तणावाचे वातावरण निर्माण होऊन पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून परतवाडा, अचलपूर शहरात जमावबंदी लागू करण्यात आली.  
 
अचलपूरच्या दुल्हा गेट वर दोन गटांमध्ये झेंडा लावण्यावरून वाद निर्माण झाला. नंतर या गटात दगडफेक सुरु झाली. घटनेची माहिती मिळतातच पोलीस बंदोबस्त करण्यात आला. जमावानं पोलिसांच्या दिशेने देखील दगडफेक केली त्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या अचलपूर आणि परतवाडा शहरात या दगडफेकी नंतर जमावबंदी लागू केली आहे. या भागात गटाला फिरण्यावर बंदी आहे. या घटनेमुळे या शहरात वातावरण तणावाचे आहे.