सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 22 मार्च 2022 (10:14 IST)

राज्यातील 'या ' जिल्ह्यात पावसाचा अलर्ट

सध्या तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवत आहे. मुंबई आणि ठाण्यासह उपनगरात ढगाळ वातावरण आहे. राज्यात काही भागात येत्या 2 दिवसात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यातील काही भागात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या भागात 23,24,25 मार्च रोजी पावसाच्या हलक्या सरी बरसणार.
सध्या बंगालच्या उपसागरामध्ये चक्री वादळाचा अलर्ट देण्यात आला आहे. तिथे कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रावर होणार आहे.