बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (16:30 IST)

राज ठाकरे यांनी अयोध्येत गेलं पाहिजे : संजय राऊत

“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येत गेलं पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांचं स्वागत करतो. राज ठाकरे अयोध्येत गेल्यानंतर, त्यांना तिथे शिवसेनेने केलेलं कार्य दिसेल” असे संजय राऊत म्हणाले. पुण्यात पत्रकारांनी त्यांना राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबद्दल प्रश्न विचारला, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं.
 
“अयोध्येत आपलं दैवत, अस्मिता आहे. देशातल्या प्रत्येक राजकीय नेत्याने, कार्यकर्त्यांने अयोध्येला गेलं पाहिजे. राम मंदिरासाठी या देशातल्या हिंदुंनी जो लढा दिला, त्यात शिवसेनेचाही सहभाग होता. त्याच्या खूणा तिथे दिसतील” असे संजय राऊत म्हणाले.
 
“गेल्या दीड वर्षांपासून उद्धव ठाकरे अयोध्येत गेले. त्यातून नवीन आंदोलन सुरु झालं, त्याचा परिणाम म्हणून राम मंदिर होताना दिसतय” असे संजय राऊत म्हणाले. तिथे गेल्यानंतर राज ठाकरेंना काही मदत लागली तर नक्कीच आम्ही मदत करु असे संजय राऊत यांनी सांगितले.