गिरीश महाजन यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल
भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. 2018 पासून चर्चेत असलेल्या खंडणी, अपहरण आणि मारहाण झालेल्या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झालाय. भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह 28 आरोपींचा समावेश आहे. जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेच्या एका संचालकाचं अपहरण करून त्यांना सदाशिव पेठेतल्या एका फ्लॅटवर डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप आहे.
या दरम्यान गळ्याला चाकू लावून राजीनामे देण्यासाठी दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाही तर एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 5 लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे.