पोलिसांच्या सतर्क भूमिकेमुळे रेव्ह पार्टी उधळली
अश्लिल नृत्य, विचित्र प्रकार आणि ड्रग्स चे सेवन या प्रकारातील ठाणे येथे दिवाळीमध्ये रेव्ह पार्टीकरता 'इफेड्रीन' हा अंमली पदार्थ ठाण्यातल्या मुंब्रामध्ये घेऊन आलेल्याला ठाणे खंडणीविरोधी पथकानं अटक केली. या आरोपीचं नाव अवील प्रकाश रॉबर्ट मोंथेरो आहे. त्याच्याकडून एक कोटी रुपये किंमतीचं चार किलो इफेड्रीन जप्त केलं आहे, मुंब्य्रातल्या कौसा भागात अवील मोंथेरो इफेड्रीन घेऊन येणार अशी गुप्त माहिती पोलिसांना होती. पोलीस पथकानं सापळा रचून ही कारवाई केली.
दिवाळीमध्ये रेव्ह पार्टी करणाऱ्या तरुण तरुणींसाठी अवीलनं चेन्नईहून मुंब्य्रात हा अंमली पदार्थ आणला होता. ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने २०११ मध्येही अवीलला अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी, मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक केली होती.