गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (16:44 IST)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 69 जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षेची घोषणा करण्यात आली असून एकूण 69 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज 18 जानेवारी 2018 पर्यंत करता येणार आहे. आयोगाद्वारे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या 69 जागांसाठी भरती करण्याची घोषणा गुरुवारी केली. 

यावेळी आयोगाद्वारे घोषणा करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या परीक्षेद्वारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (6 जागा), सहायक संचालक-महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (8 जागा), तहसीलदार (6 जागा), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (4 जागा), कक्ष अधिकारी (26 जागा), सहायक गट विकास अधिकारी (16 जागा), उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (2 जागा), सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जानेवारी 2018  आहे. यासंबंधीची अधिक माहिती www. mahaonline.gov.in Am{Uwww.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.