शारीरिक संबंध ठेवून लग्नासाठी नकार दिल्यास बलात्कार ठरत नाही - हायकोर्ट
दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवून ऐनवेळी लग्नासाठी नकार दिल्यास आरोपीवर बलात्काराचा आरोप लागू शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
मुलाने लग्नाचे वचन दिले आणि त्यातून शारिरीक संबंध निर्माण झाले,मात्र आता तो लग्नासाठी तयार नसल्याचं सांगत पीडितेने पोलीस स्टेशनला त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली.
30 वर्षीय महिलेने बलात्कार आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही तक्रार रद्द करण्यासाठी मुलाने न्यायालयात याचिका दाखल केली. सहमतीने आमच्यात शारीरिक संबंध झाले होते त्यामुळे बलात्कार होऊ शकत नाही असा युक्तिवाद आरोपीकडून करण्यात आला.
यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठाने म्हटलं, कागदपत्र आणि तक्रारीवरुन आरोपीला पीडित महिलेशी लग्न करायचे होते असे स्पष्ट होत आहे. मात्र नंतर त्याने लग्नाला नकार दिला.यामुळे त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही.