बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (10:13 IST)

Road Accident:साते गावाजवळ पालखीमध्ये टेम्पो शिरून अपघात, 20 वारकरी जखमी

मावळ तालुक्यातील सातेगावाजवळ आज पहाटे आळंदी जाणाऱ्या पालखीमध्ये भरधाव वेगाने येणारा पिकअप टेम्पो घुसल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 20 वारकरी जखमी झाले असून दोन मृत्युमुखी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
संजीवन समाधी माउलीकृपा चॅरिटेबल ट्रस्ट, खालापूर येथील 200 वारेकरी पायी आळंदीच्या दिशेने जात असताना आज सकाळी भरधाव  वेगाने येणारा पिकअप टेम्पो या पायी पालखीत शिरल्याने  या मध्ये 20 वारकरी जखमी झाले तर 2 वारकरी दगावल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातात जखमींना कामशेत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन  रुग्णालयात जखमींना दाखल केले.