रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जुलै 2023 (14:26 IST)

Sambhaji Bhide महात्मा गांधींबद्दल भिडेंचं वादग्रस्त विधान

Sambhaji Bhide Controversial Statement On Mahatma Gandhi शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता संभाजी भिडे यांनी पुन्हा एका वादग्रस्त विधान केले आहे ज्यामुळे पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल भिडेंनी केलेले वादग्रस्त वक्तव्य केल्याने कॉंग्रेसने संताप व्यक्त केला आहे.
 
संभाजी भिडे यांनी अमरावतीत एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्‍यांचे खरे वडील आहेत.
 
ते म्हणाले की मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. ते ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून पळून गेले असताना चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीला पळवून घरी आणले होते आणि त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. अशात करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. त्यांनी हा विधान करत याबाबत पुरावा असल्याचा दावाही केला.
 
संभाजी भिडे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याचे विधानसभेतही पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. 
 
कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटले की राष्ट्रपिता महात्मा गांधीची अवमानना करणाऱ्या मनोहर भिडेवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. आधी तिरंग्याचा मग स्वातंत्र्यदिनाचा आणि आता राष्ट्रपित्याचा अवमान हे देशविरोधी कृत्य आहेत.